अश्विन ४०० बळींच्या टप्प्यावर; दुसरा सर्वांत जलद

Ravichandran Ashwin

गेल्या सामन्यात भारताचा ईशांत शर्मा हा ३०० कसोटी बळी पूर्ण करणारा सर्वांत संथ गोलंदाज ठरला होता. आता भारताचाच रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा दुसरा सर्वांत जलद गोलंदाज ठरला आहे. अहमदाबादला (Ahmedabad) इंग्लंडविरुद्धच्या (England) तिसऱ्या कसोटीत गुरुवारी जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) बाद करून अश्विनने हा टप्पा गाठला.

अश्विनचा हा ७७ वा कसोटी सामना असून त्याच्यापेक्षा कमी सामन्यात फक्त मुथय्या मुरलीधरन (Muralitharan) यानेच ४०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडला होता. मुरलीने आपल्या ७२ कसोटीत बळींची चार शतके पूर्ण केली होती.

इंग्लंडचा दुसरा डाव सुरू होण्याआधी अश्विनच्या नावावर ३९७ विकेट होत्या. त्याने या डावात चार बळी मिळवून ४०० चा टप्पा ओलांडला. आर्चर हा त्याचा ४०० वा तर जॕक लीच हा ४०१ वा बळी ठरला.

४०० कसोटी बळींच्या बाबतीत क्रिकेटच्या जगतात दुसरा सर्वांत  जलद ठरलेला अश्विन हा भारतासाठी तर प्रत्येक टप्प्यावर सर्वांत जलद ठरला आहे. ५०, १००, १५०, २००, १५०, ३००, ३५० आणि आता ४०० असे टप्पे भारतीय गोलंदाजात त्यानेच सर्वांत  कमी सामन्यात गाठले आहेत. भारतातर्फे अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजननंतर ४०० बळी पूर्ण करणारा तो चौथा भारतीय आहे.

४०० बळी सर्वांत जलद
मुथय्या मुरलीधरन – ७२ कसोटी
रवीचंद्रन अश्विन- ७७ कसोटी
रिचर्ड हॕडली – ८० कसोटी
डेल स्टेन – ८० कसोटी
रंगना हेराथ- ८४ कसोटी

भारताचे यशस्वी गोलंदाज
अनिल कुंबळे – १३२ कसोटी – ६१९ बळी
कपिल देव – १३१ कसोटी – ४३४ बळी
हरभजनसिंग – १०३ कसोटी – ४१७ बळी
रविचंद्रन अश्विन – ७७ कसोटी – ४०१ बळी
झहीर खान – ९२ कसोटी – ३११ बळी
ईशांत शर्मा – १०० कसोटी – ३०३ बळी

ही बातमी पण वाचा : ड्युनेडीन येथील सामन्यात धावा व षटकारांचा पाऊस, 434 धावा, 31 षटकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER