अश्वगंधा – अश्वप्रमाणे ताकद देणारी वनस्पती!

Ashwagandha

अश्वगंधा वाजीगंधा, बलदा, वृषा नावाप्रमाणे ताकद देणारे बल देणारे औषध. अनेक आजारात उपयोगी क्षुप. कच्च्या मूळाला घोड्यासारखा वास येतो म्हणून अश्वगंधा असे म्हणतात. तसेच अश्वगंधा घेतल्याने घोड्याप्रमाणे उत्साह, बल उत्तम धातुवर्धक औषध म्हणून अश्वगंधा प्रसिद्ध आहेच. अश्वगंधा वातकफाला शमन करणारी वनस्पती आहे.

अश्वगंधा वातामुळे निर्माण होणाऱ्या वेदना कमी करणारी आहे. गलगण्ड, सूज असल्यास अश्वगंधाच्या पानांचा लेप त्यावर लावतात त्यामुळे सूज वेदना कमी होतात. वातव्याधी, दौर्बल्य, हात पाय दुखणे यावर अश्वगंधा वापरून बनविलेल तेल उपयोगी आहे. हे अश्वगंधा तेल मालीश करण्याकरीता वापरल्यास वात कमी होतो. अवयवांना मांसपेशींना बळकटी येते.

अश्वगंधा कफ कमी करणारी दमा करणारी आहे. खोकला, अशक्तपणा दमा या विकारात अश्वगंधा वापरली जाते.

रक्तभार वृद्धी, रक्ताचे विकार यामधे अश्वगंधा मूळ्याचे चूर्ण दूधात उकळवून दिल्यास फायदा होतो. अश्वगंधा उत्तम निद्रा जनन आहे म्हणून चक्कर येणे मूर्च्छा, अनिद्रा यात अश्वगंधा उपयोगी ठरते. मज्जातंतूची क्षीणता, दम लागणे, शारीरिक दौर्बल्यात अश्वगंधा फायदेशीर ठरते.

अश्वगंधा विशेषतः शुक्रधातु व मांसधातु वाढविणारी आहे. त्यामुळे शुक्र निर्मिती चांगली होण्याकरीता अश्वगंधा अनेक औषधी कल्पांमधे वापरली जाते. अश्वगंधा उत्तम वाजीकर आहे. शुक्रधातुच्या विकारांमधे अश्वगंधा उपयुक्त ठरते. पांढरे डाग असणे ( श्वित्र) या त्वचाविकारावर अश्वगंधा उपयोगी आहे.

बल वाढविणारी, सर्व शरीर धातुंची वृद्धी करणारी, रसायन कार्य करणारी वनस्पती म्हणून अश्वगंधा श्रेष्ठ मानली जाते. शरीराचा क्षय भरून काढणे, बालशोष सारख्या तक्रारीवर अश्वगंधाचा चांगला उपयोग होतो. अश्वगंधा चूर्ण, अश्वगंधा रसायन, अश्वगंधारिष्ट, अश्वगंधावलेह अश्या अनेक औषधी कल्पांच्या निर्माणात अश्वगंधा प्रमुख आहे. अशी बहुगुणी रसायन गुणाची वनस्पती वाताच्या अनेक विकारांवर फायदेशीर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER