आशुतोष गोखलेला तीभेटली दहा वर्षांनी

जगात सगळ्यात निरपेक्ष नातं कुठलं असेल तर ते मैत्रीचं. असं म्हणतात की दोन सख्या मित्रांनी रोज गप्पा मारल्या पाहिजेत असेही नाही. रोज भेटले पाहिजे असेही नाही. कितीही वर्षांनी भेटले तरी मैत्रीचा तोच भाव कायम राहत असतो. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यातील मैत्रीदेखील अशीच निखळ असू शकते हेदेखील तितकंच खरं. सर्वसामान्य मुला-मुलींमध्ये जशी मैत्री असते तितकीच घट्ट मैत्री सेलिब्रिटीमध्ये असते आणि हेच दाखवून दिले आहे अभिनेता आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) यांच्या दिलखुलास फोटोने. एका मित्राच्या लग्नात प्रिया आणि आशुतोष तब्बल दहा वर्षांनी भेटले आणि फक्त भेटलेच नाही तर त्यांनी कडकडून मिठी मारली आणि एकमेकांच्या गालावर एक गोड पप्पी दिली. हाच फोटो शेअर करत आशुतोष याने एक भन्नाट कॅप्शनदेखील दिली आहे तो म्हणतो, की दहा वर्षांनी मला ती भेटली .. फक्त प्रियाच नव्हे तर तिची गोड पप्पी.

अभिनय इंडस्ट्रीमधला मित्रमंडळींची नेहमी चर्चा होत असते. कामाच्या व्यापातून आणि शूटिंगच्या तारखा सांभाळत अभिनेते कलाकार हे नेहमी त्यांच्या मित्रमंडळींना भेटत असतात. त्याचे अनेक किस्से फोटो आपण त्यांच्या या पेजवर पाहत असतो. शिवाय मित्र मंडळीचा ग्रुप एकत्र करून ही सेलिब्रिटी मंडळीधमाल करत असतात. हे देखील आपल्याला त्यांच्या फोटोवरून दिसत असतं. नुकताच प्रिया बापट आणि आशुतोष गोखले यांच्या मैत्रीचा निखळ फोटो नुकताच त्यांनी सोशल मीडिया पेजवर शेअर केला.

आशुतोष गोखले हा सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत डॉक्टर कार्तिक ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी त्याने तुला पाहते रे या मालिकेतही काम केलं होतं. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा असलेला आशुतोष गोखले याने देखील त्याच्या करिअरसाठी अभिनयाचा प्रांत निवडला. अभिनेत्री प्रिया बापटला अनेक मालिका सिनेमा तसेच वेब सिरीज मध्ये पाहत आलेलो आहोत. शिवाय फिटनेसप्रेमी असल्याने सतत नवनव्या व्यायामाचे फोटो ती तिच्या सोशल मीडियापेजवर शेअर करत असते. अनेक जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून देखील प्रियाने काम केले आहे. रुपेरी इंडस्ट्रीमधील एक बिनधास्त आणि सुंदर अभिनेत्री म्हणून प्रियाची ओळख आहे. मध्यंतरीच्या काळात प्रियाही तिच्या व्यापात होती तर आशुतोष हा त्याच्या अभिनय प्रवासातील स्ट्रगलमध्ये व्यस्त होता. त्यामुळे प्रिया आणि आशुतोष खूप जुने मित्र मित्र असूनही त्यांना भेटता आलं नव्हतं. एखादा पुरस्कार मिळाला तर नेहमी आशुतोष प्रियाला फोन करून शुभेच्छा द्यायचा. तर आशुतोषचत नवी मालिका छोट्या पडद्यावर झळकली की त्याच्या कामाबाबत प्रिया त्याला मेसेज करून अभिनंदन करायची. इतपतच त्या दोघांचा संवाद होता. पण गेल्या आठवड्यात मुंबईत एका मित्राच्या लग्नसमारंभात प्रिया आणि आशुतोष यांची भेट झाली. या लग्नसमारंभात प्रिया आणि आशुतोषच्या सगळ्या मित्र मंडळीच्या ग्रुपने धमाल केली. खूप सारे फोटो काढले. यावेळी आशुतोष आणि प्रिया यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारत त्यांचे मैत्री सेलिब्रेशन साजरे केले. यावेळी प्रियाने आशुतोषच्या गालाची एक गोड पप्पी घेतली. हा फोटो अर्थातच क्लिक झाला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोसोबत आशुतोषने दिलेल्या कंमेंट्स ची चांगली चर्चा रंगली आहे. या कमेंट मध्ये तो म्हणतो, की दहा वर्षांनी मला ती भेटली ..हो फक्त प्रियाच नाही तर तिची गोड पप्पी . या कमेंट वर प्रियाने छान उत्तर दिले आहे. या उत्तरामध्ये ती म्हणते की, हा सगळ्यात छान फोटो आहे. हा फोटो बघून अनेकजण जळत असतील पण आपण त्याची पर्वा करायची नाही असं म्हणत प्रिया आणि आशुतोष यांनी मैत्रीतला हा क्षण आयुष्यभर जपायचं ठरवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER