राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, आता खाजगी रुग्णालयातील कोरोनावरील उपचार मोफत

Ashok Gehlot

नवी दिल्ली : देशभरात कोरोना (Corona) रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अशावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सर्वसामान्यांना दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. गेहलोत सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जोडल्या गेलेल्या सर्व कुटुंबियांना मिळणार आहे.

राजस्थान राज्य आरोग्य विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांना सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. या योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाने नकार दिला तर त्या रुग्णालयाविरोधात कडक कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी मान्यता प्राप्त रुग्णालयांमध्ये चिरंजीवी योजनेशी जोडले गेलेल्या कुटुंबाला कोरोनावरील उपचारासाठी नवं पॅकेज मंजूर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button