अशोक चव्हाणांचा राजीनामा भाजप नव्हे तर, मराठा समाज मागेल – चंद्रकांत पाटील

Ashok Chavan - Chandrakant Patil

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात मोठा रोष व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात (Maratha Community) निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची अशोक चव्हाणांबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांनी ट्विट करूनही आपली भूमिका मांडली आहे. अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना जर मराठा समाजात निर्माण झाली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल. पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) एका समितीची नियुक्ती केली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

आम्ही ‘सारथी’ला एक एकर जागा उपलब्ध करुन दिली. आता तिथे आम्ही भवन उभारत आहोत, असे अजितदादा सांगत आहेत. पण ती इमारत उभी करायला ५ वर्ष लागतील. अजितदादा, या ५ वर्षांमध्ये भाडे तत्त्वावर एखाद्या जागेत का होईना पण ‘सारथी’चे कामकाज चालवणार आहात की नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरूनही त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण होऊन अहवाल यायला किती वेळ लागेल हे मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे का? ओबीसी आरक्षणसंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅज्युअल ॲप्रोचचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button