चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय ; अशोक चव्हाणांचा टोला

Ashok Chavan - Chandrakant Patil

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला आहे .

मी चंद्रकांत पाटलांसारखी तारीख पे तारीख देणार नाही. आल्यापासून त्यांनी निर्माण केलेले खड्डे बुजवतोय. दुसरं कामच उरलेलं नाही. हे खड्डे दिसावेत आणि ते तात्काळ बुजवून घेता यावेत म्हणून विमानाऐवजी गाडीनेच फिरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले .

दरम्यान चव्हाण यांनी यावेळी काँग्रेसकडे असलेल्या पालिकांना निधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.काँग्रेसच्या ताब्यातील महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नसल्याचं सांगत चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आघाडीत अजूनही बिघाडी असून काँग्रेस सत्तेत असूनही नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER