अशोक चव्हाणांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

Ashok Chavan-Raj Thackeray

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Service) सर्वसामान्यांसाठी करावी अशी मागणी करत सविनय कायदेभंग आंदोलन केले. मनसेनं राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची परिस्थिती एकदा समजून घ्यावी, असा सल्ला काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. तसेच, ‘मराठा समाजाने आंदोलने करावे, पण त्याला कोणतेही राजकीय लेबल लावू नका’, असेही ते म्हणाले .

अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात भेट घेतली. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची मराठा आरक्षण मुद्यावर बैठक सुरू झाली आहे. याआधी पत्रकारांशी बोलत असताना अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलन आणि मनसेला सल्ला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER