मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

Ashok Chavhan Meets Governorr

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील या भेटीची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच काँग्रेसच्या नेत्यांच्या नाराजीचा मुद्दाही सतत पुढे येत आहे. अशा परिस्थितीत अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेणार असल्याचीही माहिती काँग्रेसच्याच एका जेष्ठ नेत्याने दिली आहे. त्यामुळे या भेटींमागे अनेक तर्क लावले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER