अशोक चव्हाणांना हटवा; मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला मराठा समन्वय समितीचा विरोध

Ashok Chavan-Maratha Coordinating Committee-Vinayak mendhe

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mendhe) आता अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत. मराठा आरक्षण सरकारच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना हटवा, अशी मागणी मराठा समन्वय समितीने केली आहे. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या नऊ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठित झाली आहे.

या समितीने सरकारच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी केली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उद्याच्या नाशिक दौऱ्यालाही विरोध केला आहे. मराठा समन्वय समितीची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली. बैठकीनंतर विनायक मेटे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

‘सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असताना त्याकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार गांभीर्याने पाहात नाही. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणाच दिसून येत आहे. त्यामुळे मिळालेले आरक्षण जाते की काय, अशी शंका आहे.

तसंच समाजाचे प्रश्नही प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीमध्ये अशोक चव्हाणांना हटवावे. एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून जबाबदारी काढून घ्यावी, असं विनायक मेटे म्हणाले आहेत. सरकारला जागं करण्यासाठी उद्या ९ ऑगस्टला आंदोलन करणार. हे आंदोलन पुण्यात बालगंधर्व चौकात होईल. मशाली पेटवून, जागरण गोंधळ घालून, काळे कपडे परिधान करून आंदोलन करणार, असं मेटे यांनी सांगितलं.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER