अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही, उपसमितीचा राजीनामा द्यावा- मेटे

Ashok Chavan - Vinayak Mete

मुंबई :- मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्याने राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी आक्रमक भूमिका घेत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना समितीवरून हटवा अशी मागणी  त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वकिलानं अनुपस्थित राहून जे गलथानपणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं ते निषेधार्ह आहे. अशोक चव्हाण यांना याचं गांभीर्य नसल्यानं, त्यांनी या उपसमितीचा स्वतः राजीनामा देणं गरजेचं आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

“मी सातत्याने बोलतो आहे की, सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नाही. यांना त्याचं काहीही पडलेलं नाही. परंतु प्रत्येक वेळी या बोलण्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण यांनी केला. आज सुनावणी आहे हे अनेक दिवसांपासून माहिती आहे. त्याच खंडपीठाकडे सुनावणी गेली आहे. हेदेखील माहिती असताना, काल व आज सांगितलं जात आहे की, आम्ही तिथं भूमिका मांडणार नाही. तुम्ही मांडली किंवा नाही मांडली तरी बाकीचे याचिकाकर्ते तिथं गेलेले आहेत. तुम्ही जर भूमिका नाही मांडली तर उलट त्याचा परिणाम जास्त वाईट होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा सरकारी वकिलानं  तिथं मराठा समाजाच्या बाजूनं  भूमिका मांडणं गरजेचं आहे. पण हजरच राहायचं नाही हा कोणता प्रकार आहे? हा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे.” तसेच, म्हणूनच आम्ही मागणी केली होती की,अशोक चव्हाण यांना याचं गांभीर्य नसल्याने, त्यांनी या उपसमितीचा स्वतः राजीनामा देणं  गरजेचं आहे, असंही एबीपी माझाशी बोलताना मेटे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात पहिली आणि महत्त्वाची सुनावणी होती. ११ वाजता सुनावणीला सुरुवात झाली. मात्र राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी हजर झालेले नसल्याने काही काळासाठी ही सुनावणी तहकूब झाली आहे व अद्यापही सुनावणी सुरू झालेली नाही. तर, सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीमुळे याचिकाकर्ते व विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून पुन्हा एकदा केला गेला आहे.

ही बातमी पण वाचा : अशोक चव्हाणांना फोन करुन काय करायचा , त्यांना या गोष्टी माहिती नाही का ?;  संभाजीराजे संतापले  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER