ऑक्सिजनसाठी 15 लाखांची मागणी; अशोक चव्हाणांचा थेट नितीन गडकरींना फोन

Maharashtra Today

मुंबई : देशभरात कोरोनाच्या(Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) गरजू लोकांच्या मदतीसाठी धावत आहेत . त्यामुळे त्यांना कोरोना लढाईचं नेतृत्व द्यावे , अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षातील नेत्याला रात्री 12 वाजता मदत केली आहे.
नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणमच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. त्यामुळे नांदेडमध्ये सर्वत्र धावपळ उडाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ?(Ashok Chavan)यांना या घटनेची माहिती मिळाली. त्या ट्रान्सपोर्टरने अशोक चव्हाण यांच्याकडे 15 लाख रूपयांची मागणी केली. त्यानंतर यासंबंधी अशोक चव्हाण यांनी थेट गडकरींना फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला.

अशोक चव्हाण यांचा आपल्याला फोन आला. त्या ट्रान्सपोर्टरने आपल्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केल्याचं चव्हाण यांनी नितीन गडकरींना सांगितले . त्यानंतर त्याचे टँकर जप्त केले. मी रात्री 12 वाजता त्या ट्रान्सपोर्टरला फोन केला आणि मी त्याला दाब टाकला. त्याला सांगितलं हे बरोबर नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला, असे नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button