अशोक चव्हाण १०० सधन कुटुंबातील, त्यांना समाजाची चिंता असण्याचे कारण नाही – चंद्रकांत पाटील

Ashok Chavan - Chandrakant Patil

मुंबई : बुधवारी सुप्रीम कोर्टाने(SC) राज्य सरकारने मराठा समाजासाठी(Maratha Reservation) लागू केलेला आरक्षणाचा कायदा रद्द केला. त्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण(AShok Chavan) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत आरक्षण रद्द झाल्याचे संपूर्ण खापर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर फोडले. तसेच न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार राष्ट्रपती आणि आणि केंद्राने आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी मागणीही केली. अशोक चव्हाण यांच्या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil)यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले.

ज्या कायद्याविषयी राज्यातील २ सभागृह, उच्च न्यायालय, देशाचे ऍटर्नी जनरल, सुप्रीम कोर्टातील २/५ न्यायाधीश सगळ्यांना स्पष्टता आहे की, १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला मागास समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत. तरी अशोक चव्हाण वारंवार खोटं बोलून मराठा समाजाची दिशाभूलचं करताय. माजी पंतप्रतधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात केंद्र व राज्य दोन्हीकडे काँग्रेसचीच सत्ता होती. जर आरक्षण देणे केंद्राच्याच हातात होते तर त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या नेत्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचाच नव्हता. आपणही १०० सधन कुटुंबातच सामील आहात, मग आपल्याला समाजाची चिंता का असेल? असा खोचक प्रश्न उपस्थित करत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला.

केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा गायकवाड कमिशनची मुदत संपल्यानंतर स्थापन न केलेला मागास आयोग स्थापन करा आणि ज्या मुद्द्यांच्या आधारे आरक्षण फेटाळले गेले त्यांचा पुन्हा अभ्यास करून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करा, असे आव्हान त्यांनी सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button