बघू कोण किती प्रामाणिक आहे ते? मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला टोला

Ashok Chavan - Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . यावरून समाजाने आक्रमक पवित्रा घेतला . मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोर्चात भाजपही सामिल झाला आहे. त्यावरून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आम्ही आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजप मोर्चे काढत आहे. बघू आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे, असा इशारा काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा:- माझं तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ, संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती

अशोक चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत. ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चाचे इशारे देते आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button