अॕशली बार्टीने सलग दुसऱ्या वर्षी कायम राखले क्रमवारीतील सर्वोच्च स्थान

Ashleigh Barty

कोरोनामुळे (Corona) वाईट रित्या प्रभावीत झालेल्या आणि वर्षभरात केवळ 27 स्पर्धा होऊ शकलेल्या व्यावसायिक टेनिसच्या (Tennis). महिला गटातील वर्षाअखेरची जागतिक क्रमवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार आॕस्ट्रेलियाची (Australia) अॕशली बार्टी (Ashley Barty) हिने क्रमवारीतील सर्वोच्च स्थान कायम राखले आहे.

दरवर्षी खेळाडूंची क्रमवारी ही 52 आठवड्यादरम्यान त्यांच्या एकेरीसाठी सर्वोत्तम 16 स्पर्धा किंवा दुहेरीसाठी 11सर्वोत्तम स्पर्धांच्या कामगिरीवर ठरत असते. मात्र यंदा कोरोनामुळे मार्चपासून स्पर्धा ठप्प झाल्या आणि खेळाडूंची त्यावेळी असलेली क्रमवारी गोठविण्यात आली. क्रमवारी गुणांसाठी 52 आठवड्यांची अट शिथील करण्यात आली. यंदासाठी नव्या पध्दतीनुसार मार्च 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान एकेरीच्या 16 सर्वोत्तम कामगिरी आणि दुहेरीतील सर्वोत्तम 11 निकाल विचारात घेतले जाणार आहेत आणि त्यात 2019 व 2020 मधील टूर लेव्हल व ग्रँड स्लॕम स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.

या नियमावलीनुसार आॕस्ट्रेलियाची अॕशली बार्टी ही सलग दुसऱ्या वर्षी नंबर वन म्हणून वर्षाला निरोप देणार आहे. 24 जून 2019 रोजी ती पहिल्यांदा नंबर वन बनली होती. ती आता क्रमवारीत 50 आठवडे नंबर वन आहे. 2019 पासून ती सात स्पर्धा खेळली आहे आणि या काळात तिने 2019 ची फ्रेंच ओपन व शेंझेन येथील डब्ल्यू टी ए फायनल जिंकली होती. यंदा 11 विजय आणि 3 पराभव अशी तिची कामगिरी आहे. 2019 पासून सात स्पर्धांची तिने अंतिम फेरी गाठली आहे.

महिला दुहेरीत तैपेईची सी सु वेई ही पहिल्यांदाच दुहेरीत वर्षअखेर नंबर वन ठरली आहे. नंबरवन स्थानी तीला आता 26 आठवडे झाले आहेत. बार्बरा स्ट्रायकोव्हासोबत तिची जोडी दुसऱ्या स्थानी आहे. या जोडीने यंदा पाच स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. त्यात चार विजेतेपदं आणि आॕस्ट्रेलियन ओपनचे उपविजेतेपद आहेत.

यंदा सोफिया केनिन व इगा स्वायटेक ह्या दोन नव्या ग्रँड स्लॕम विजेत्या महिला टेनिसला मिळाल्या आहेत.सिमोना हालेप व नाओमी ओसाका ह्यांचीसुध्दा चांगली कामगिरी झाली आहे. यासोबतच व्हिक्टोरिया अझारेंका, किम क्लायस्टर्स, स्वेताना पिरोनकोव्हा ह्यांनी पुनरागमन केले.

लागोपाठ दोन वर्ष नंबर वन राहिलेली बार्टी ही 11 वी खेळाडू ठरली. ती आता 336 आठवडे टॉप 10 मध्ये कायम आहे आणि सक्रीय खेळाडूंमध्ये हे सर्वाधिक आठवडे तर एकूण आठवे सर्वाधिक आठवडे आहेत. नाऔमी ओसाकाने सलग दुसऱ्या वर्षी तिसरे स्थान कायम राखलै आहे. सोफिया केनिन ही पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER