
कोरोना रुग्णांची संख्या जशी सगळीकडे वाढत आहे तशीच ती आता बॉलिवूडमध्येही (Bollywood) वाढू लागली आहे. याची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसात समोर आली आहेत. सरकारने कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून लॉकडाऊन केले होते. मात्र सात-आठ महिने घरात बसलेल्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने लॉकडाऊन उठवला. कोरोनाच्या उपाययोजना करीत बॉलिवूडला शूटिंगची परवानगीही दिली. अनेक निर्मात्यांनी कोरोनाच्या उपाययोजना सेटवर केल्या असल्या तरीही सेटवर अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत आहे. रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, तारा सुतारिया, मनोज वाजपेयी यांच्यानंतर आता अभिनेता आशिष विद्यार्थीलाही (Ashish Vidyarthi) कोरोनाची लागण झाली आहे.
स्वतः आशिष विद्यार्थीनेच तो कोरोना पॉजिटिव्ह असल्याची माहितीही सोशल मीडियावर एका व्हीडियोच्या माध्यमातून दिली आहे. आशिष विद्यार्थी सध्या दिल्लीतील साकेत विभागातील मॅक्स हॉस्पिटमध्ये अॅडमिट आहे. आशिषने व्हीडियोत म्हटले आहे, ‘नमस्कार बंधु, कालपासून थोडा त्रास होत होता. त्यामुळे मी कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह निघाली आहे. आता मी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायला जात आहे. तसे सर्व ठीक आहे, मी ठीक आहे. खऱ्या जगात तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. पण गेल्या काही दिवसात दिल्ली आणि मुंबईत माझ्या संपर्कात जे आले त्यांनीही त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंतीही आशिष विद्यार्थीने व्हीडियोत केली आहे.
यासोबतच आशिषने हॉस्पिटमधीलही काही व्हीडियो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या व्हीडियोमध्ये त्याने ९० च्या दशकातील त्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला