‘ज्या पक्षाने पुनावाला यांना धमकी दिली त्याला उघड पाडणार’, आशिष शेलारांचा इशारा

Ashish Shelar - Adar Punawala - Maharashtra Today

मुंबई :- मागील काही दिवसांमध्ये काही प्रभावी व्यक्तींचे मला फोन येऊन गेले. ज्यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे, असा म्हणत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संताप व्यक्त केला. तसेच यात ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं असा इशारा दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी शेलार म्हणाले, पूनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली तर ही गंभीर बाब आहे. त्यांचा रोख जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे असेल तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्र सरकारने सुरक्षा पुरवत आपलं काम कर्तव्य बजावलं आहे. करोनाच्या संकटात आता आम्हाला राजकारण करायचं नाही. लोकांची सेवा करणं भाजपाने धोरण आखलं आहे असंही ते म्हणाले.

या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडं करण्याचं काम कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर भाजपा करणार आहे. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही. ज्यांचा हात आहे त्यांनी सावध राहावं, आमच्याकडे माहिती येत आहे, असा इशारा त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : ‘फडणवीसांकडून करेक्ट कार्यक्रमाचा पुनरुच्चार आघाडी सरकारसाठी गर्भित इशारा- आशिष शेलार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button