…नाही तर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही नाही ! शेलारांची टीका

Ashish Shelar-uddhav thackeray

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सामान्य मुंबईकरांचा मुद्दा पुढे करत महाविकास आघाडी सरकारवर (MVA Govt) ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. “विकासकांना प्रिमियममध्ये सूट देण्याची फाईल आज पुन्हा मंत्रिमंडळात येणार असे समजतेय… पण सगळं नीट ‘ठरलंय’ ना? काँग्रेसचं मन वळलंय ना? नाही तर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही नाही!

आमचा सवाल एवढाच आहे, घरं घेणाऱ्या सामान्य मुंबईकरांना फायदा होणार का? असा प्रश्न ठाकरे सरकारला केला आहे. प्रिमियमच्या सुटीची खैरात बिल्डरला वाटाल आणि घरं घेणाऱ्यांची स्टॅम्पड्युटी विकासक भरेल अशी फसवी अट टाकाल तर खबरदार! घरांच्या किमती वाढवून स्टॅम्पड्युटी विकासक भरेल, असा ‘हातभट्टीचा’ व्यवहार करून सामान्य मुंबईकरांना फसवलंत तर आम्ही त्याचा जाब विचारतच राहू!” असा इशारादेखील शेलार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे .

:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER