बियाणे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यास पोलिसांची बेदम मारहाण; आशिष शेलारांनी घेतली भेट

Ashish Shelar

बीड :- बियाणं खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई येथे घडली आहे. कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेले शेतकरी मोतीराम चाळक यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या शेतकऱ्याची भेट घेतली. त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहचवू, असे आश्वासन दिले. तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती दिली. आम्ही लॉकडाऊनचे (Lockdown) नियम पाळतो.

सकाळी ११ पर्यंत बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात. मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने (Thackeray Govt) बांधावर आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारू तरी नका, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतीकामाची कोणतीही कामं-दुकानं थांबवलेली नाहीत, असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही अशी अमानुष मारहाण का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button