पाणी कुठं तरी मुरतयं; आशिष शेलारांनी उपस्थित केली शंका

मुंबई :- बांधकाम उद्योगाला (Construction Industry) दिलासा देण्यासाठी बांधकाम अधिमुल्यात वर्षभरासाठी ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार आहे. हा प्रस्ताव बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

ही बातमी पण वाचा:- सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे…; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

मात्र, काँग्रेसने (Congress) घेतलेल्या आक्षेपामुळे तो मंजुर होऊ शकला नाही. त्यावरून भाजपाचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शंका उपस्थित केली आहे.

बांधकाम व्यवसायिकांना ५० टक्के प्रिमियममध्ये सुट देण्याचा प्रस्ताव पुन्हा मंत्री मंडळाने राखून ठेवला? का? कशाला? एवढं काय आहे त्या प्रस्तावात? काँग्रेसने प्रस्ताव का रोखला? पाणी कुठं तरी मुरतयं, काँग्रेसच्या हातात तूरी? लक्ष्मीदर्शनावरुन तीन पक्षांची मारामारी? असे सवाल करत आशिष शेलारांनी प्रस्ताव लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER