‘महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी’? आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

CM Uddhav Thackeray - Ashish Shelar

मुंबई : मागील चार ते पाच महिन्यांपासून कुलूपबंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, दिवाळीकाळात करोना रुग्णांची वाढती संख्यालक्षात घेता मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. त्यावरून संभ्रम निर्माण झाला असून, भाजपाने (BJP) याचं मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत “महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?,” असं ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीकास्त्र डागलं आहे.

शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच..पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत आहेत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, परीक्षा घेण्यावरुन संभ्रम. परीक्षा घेतल्या त्यात पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप. अॅडमिशवरुन गोंधळ. फी वाढीबाबत हतबलता. अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह. शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ. महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी? असा प्रश्न शेलार यांनी सरकारला केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER