…तर अशा ट्रकभर एसआयटी लावाव्या लागतील, जाऊ द्या ना ताई; आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

मुंबई :- गणेश नाईक यांच्या भाषणातील एका विधानाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी केली होती. त्यावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा : गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

आशिष शेलार यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक यांच्या भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीर, बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे… आणि पूजा चव्हाणचा मृत्यू… अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER