राज्यातील सत्ताधार्‍यांना आला आहे सत्तेचा माज; आ. आशिष शेलार यांचा घणाघात

ashish-shelar

मुंबई :- भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी आज मंगळवारी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यातील सत्ताधार्‍यांना सत्तेचा माज आल्याचे दिसून येत आहे, असे आ. शेलार यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेचा समाचार घेताना आ. शेलार यांनी ही टीका केली.

… तर शेतकरी कर्जमाफीला ४०० महिने लागतील : देवेंद्र फडणवीस

विधान भवनाच्या पायर्‍यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या घोषणा बघून, आमचे मागचे दिवस आम्हालाही आठवले, असा टोला अजित पवार यांनी आज भाजपाला लगावला. त्याचा समाचार घेत, माध्यमांशी बोलताना आ. शेलार म्हणाले, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांकडे लक्ष देण्यापेक्षा त्यावर विकृत भाष्य करणे सुरू आहे. यातून हा माज दिसून येतो. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही आमचा घसा फुटला तरी बोलत राहू, असे ते यावेळी म्हणाले.