विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श न करणारे हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी- आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : मिशन बिगेन (Mission Begin) अंतर्गत आपण लॉकडाऊन (Lockdown) हा शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता आपल्याला हिंदुत्वाचा विसर पडला का? धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारले का? मंदिरे उघडी न करण्यासाठी दैवी संकेत मिळाले का? असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्राच्या माध्यमातून विचारला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना सडेतोड उत्तर दिले आहे.

“माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे; मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले. मात्र यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा भडिमार केला आहे.

जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये ‘शेजारी-शेजारी’ बसलेत. यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमिपूजन ई-पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते. ‘भारत तेरे तुकडे हो हजार’ म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. एवढेच नाही तर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली, याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले, पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही, हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी आहेत, असे म्हणत शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना खडे बोल सुनावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER