भगवा तर तुम्हीच उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील; आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोमणा

Ashish Shelar-Uddhav Thackeray

मुंबई :- मुंबई मनपाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत ‘भगव्या’वरून वाद सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेससोबत युती केल्याबद्दल, काँग्रेसने केलेल्या ‘कामगिरी’चा उल्लेख करून भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला टोमणा मारला – भगवा तर तुम्ही तुमच्याच हाताने उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील.

मुंबई (Mumbai) जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेवर यावेळी शुद्ध भगवा फडकवायचा, असे ठरवले आहे. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली होती.

ही बातमी पण वाचा : मुंबईत फडकत असलेला भगवा शुद्धच, त्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल – शिवसेना

शेलार यांनी ट्विट केले – १०५ हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला, कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली, याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत सत्तेत बसलात तेव्हाच ‘भगव्या’चा रंग तुम्हीच फिका केला. भगवा तर तुम्हीच तुमच्या हाताने उतरवलात.

भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच महापालिकेत पारदर्शक कारभाराची, विकासाची गुढी उभारतील. गुढीला ‘शुद्ध भगव्याची’ झालर चढवतील. तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा. मुंबईकरांना ‘चॅलेंज’ देताय, मुंबईकरच आता करून दाखवतील, असे ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER