
मुंबई : वर्षा राऊत यांना ईडीची (ED) नोटीस मिळालेले संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) गलिच्छ शब्दात टीका केली. भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत तशाच भाषेत राऊतांना उत्तर दिले.
शेलार यांनी ट्विट केले – ‘प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!’
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना अंमलबजावणी संचनालयाने नवे समन्स बजावले आहेत. ५ जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असे निर्देश वर्षा राऊत यांना देण्यात आले आहेत. यावरून शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय?
गाव का गोळा करावा लागतोय?
ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय,तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत.
चला हवा येऊ द्या!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 30, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला