
मुंबई :- लॉकडाऊननंतर (Lockdown) राज्यातील अर्थव्यवस्था पूर्ववत आणण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray govt) अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. मिशन बिगेन अंतर्गत राज्यात बार, दारूची दुकानं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु अद्यापही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. यावरून राज्य सरकारवर चौफेर टीका होत असून भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या विषयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत शेलार यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.
आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट..
महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले…शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर..
तेव्हा नगराचे राजे “बॉलिवूड” कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले!
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
“आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट… महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातलेले… शेती, घरे, गुरे सारे काही उद्ध्वस्त झालेले… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर अनावर… तेव्हा नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले… मदतीसाठी राजा येतच नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय… त्यावेळी नगरात कुणीही मागणी केलेली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री ११.३० पर्यंत खुले ठेवून ‘नाईट लाइफ’ची काळजी राजपुत्र करत आहेत…दुर्दैवी चित्रं… महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा.” असं ट्विट करत शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
दरम्यान, राज्यातील मंदिरं सुरू करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. भाजप, एमआयएम, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह धार्मिक संघटनांनीही मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि धार्मिक संघटनांनी तर या विषयावर आंदोलनेही केली आहेत. तरीही सरकारने या मागण्यांकडे पूर्णपणे काणाडोळा केल्याने त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला