ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे? आशिष शेलारांचा सवाल

Sachin Waze-Ashish Shelar

मुंबई :- मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात (Mansukh Hiren Death Case) घडलेल्या घटना आणि योगायोग एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या भोवती फिरत आहेत. वाझे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत आणि एटीएसचाही भाग नाहीत. तरीही ते ठाण्यात हिरेन यांचा पोस्टमार्टम सुरू असलेल्या ठिकाणी हजर का आहेत? असा सवाल भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.

शेलार यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून सचिन वाझेंबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे, असं शेलार म्हणाले. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असल्याचं पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची एनआयएकडे चौकशी देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधानसभेत ठाणे पोलीस, मुंबई पोलीस हिरेन मृत्यूप्रकरणी योग्य काम करतील अशी भूमिका मांडली होती. मुंबई-ठाणे पोलिसांची शौर्यगाथा सांगणाऱ्या गृहमंत्र्यांना अवघ्या अर्ध्या तासातच हा तपास एटीएसकडे का द्यावा लागला? तपास कुणाकडे द्यावा हा राज्य सरकारचा अधिकार आहे. पण अर्ध्या तासात असे काय घडले की त्यामुळे गृहमंत्र्यांना आपल्या भूमिकेवरून फिरावं लागले . याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, अशी मागणीही शेलार यांनी केली.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन पट्टीचे पोहणारे, नक्कीच घातपात झाला असणार; निकटवर्तीयांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER