कोरोना काळात आरोपींना अटक करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

Ashish Shelar questions Thackeray government

मुंबई : राज्यातील कारागृहांची कैदी ठेवण्याची क्षमता संपली आहे. सध्या राज्यातील कोरोनाच्या (Corona) साथीची स्थिती लक्षात घेऊन यापुढे अत्यावश्यक असेल तरच आरोपींना अटक करा, असे निर्देश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले आहेत. यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) टीका करताना प्रश्न विचारला आहे, कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?

आशिष शेलार यांनी ट्विट केले – “अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करून भांडूपच्या ड्रीम मॉलमध्ये सनराइज हॉस्पिटल अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली!”

“कोरोनामुळे राज्यातील जेलमध्ये कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारगृह) यांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा! तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

“कोरोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करून सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.


आदेश

राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता यापुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करा, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत. ४६ कारागृहांची कैदी ठेवण्याची क्षमता २३ हजार २१७ असून सध्या ३४ हजार ८९६ कैदी कारागृहांमध्ये आहेत. क्षमतेपेक्षा ११ हजार ६७९ कैदी अधिक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कारागृहात संसर्ग वाढू शकतो असे लक्षात आले असल्याने आरोपीची अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे आदेशात म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button