भाजपाच्या आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरेंच्या मुलाचे तोंडभरून कौतुक, म्हणाले…

Ashish Shelar.jpg

मुंबई : भाजपाचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला.

ही बातमी पण वाचा:- उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजसची दमदार कामगिरी; चन्ना प्रजातीचा शोध

निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या तेजस ठाकरे यांनी एक महत्त्वाचे सागरी संशोधन केले. त्यावरून शेलार यांनी त्याची पाठ थोपटली. उर्जावान तेजस ठाकरेंचे (Tejas Thackeray) नवीन मत्स्यजीव शोधाकरिता अभिनंदन! करोनाकाळातही ते आपल्या कामाशी दृढपणे कटिबद्ध राहिले व आपल्या कामगिरीतून मत्स्यशास्त्रातील ज्ञानगंगेत भर पाडली, हे कौतुकास्पद! त्यांच्या नवीन वर्षातील वाटचालीस शुभेच्छा! असे ट्विट करत त्यांनी तेजस ठाकरेंचे कौतुक केले.

दरम्यान महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर आशिष शेलार यांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या चुकीच्या धोरणावर टीका करत असतात . पण आज मात्र त्यांनी उद्धव यांचा धाकटा सुपुत्र तेजस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले .

दरम्यान तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आणि त्यांच्या टीमने मेघालय येथे महत्त्वपूर्ण संशोधन करत अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असा ‘चन्ना स्नेकहेड’ (Channa Snakehead) हा मासा शोधला आहे. चन्ना स्नेकहेड या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचे तेजस ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER