तेजस ठाकरेंनी केलेले काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे; आशिष शेलारांकडून कौतुक

ashish-shelar-on-tejas-thackrey.jpg

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे छोटे सुपुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे . तेजसचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, अशा शब्दांत त्यांनी तेजस यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

ही बातमी पण वाचा:- तेजस ठाकरेंचा नवा शोध ; सह्याद्रीच्या पर्वतरांगात शोधला ‘हिरण्यकेशी’ मासा

‘जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात आविष्कारांचे रंग तेजस उद्धव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे, असे ट्विट तेजस ठाकरे यांनी केले.

दरम्यान ठाकरे यांचे पूर्ण कुटुंब राजकारणात असूनही राजकारणापासून लांब राहणाऱ्या तेजस ठाकरे यांना जैवविविधतेतील संशोधनात रस आहे. यासाठी ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कायमच भटकंती करीत असतात. नुकतीच त्यांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. अंबोली गावमधील हिरण्यकश नदीमध्ये त्यांनी सोनेरी रंगाचे केस असणारा नवा मासा शोधला आहे. सोनेरी रंगाचे केस असणारी ही माशांची २० वी प्रजाती असून तेजस ठाकरेंनी शोध लावलेली चौथी प्रजाती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER