मुंबईकरांच्या नुकसानीपासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही

Ashish Shelar

मुंबई : अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने अतिरौद्ररूप धारण केले आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चक्रीवादळामुळे मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती आणि महापालिका करत असलेले मदतकार्य याबाबत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मदतकार्याची माहिती घेतली. तसेच, मुंबईकरांचं जे नुकसान झालं त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही, असा त्यांनी इशारा दिला आहे.

मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत. पण जे नुकसान मुंबईकरांचे झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. तौक्ते चक्रीवादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईकरांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेशी मी स्वतः भेटून आल्यानंतर व मुंबईत झालेल्या प्रवासानंतर हे लक्षात आलं आहे की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेली झाडं व वाहनांचं झालेलं नुकसान, अनेक झोपड्यांची छतं उडून गेली आणि या नुकसानाबरोबरच अनेक ठिकाणी पाणीदेखील तुंबलेलं दिसून आलं आहे.

आमचे पोलीस व मनपाचे अधिकारी तैनात नक्कीच आहेत; पण पावसाळ्या अगोदर केलेल्या कामांचा बोजवारा व ज्या पद्धतीने मुंबईची तुंबई करून सोडलं आहे, यामधून मनपातील सत्ताधारी व कंत्राटदार यांना पळवाट काढता येणार नाही. म्हणून या सगळ्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, अशी मी त्यांना विनंती केली आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button