सामनाचा अग्रलेख म्हणजे ‘खाली डोके वर पाय’; आशिष शेलारांनी उडवली खिल्ली

Ashish Shelar

मुंबई : “आजच्या सामना अग्रलेखाला खाली डोके वर पाय म्हणावे लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona) आकडे सर्वांत जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वांत जास्त का आहे? मग याचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) घ्यायचे नाही का?” असा टोमणा भाजपायाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मारला.

तरीही केंद्राला दोष?
मुख्यंत्री उद्धव ठाकरे रोज केंद्रापुढे हात जोडत आहेत. लस द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्हाला एअरफोर्सची सुविधा द्या, १८ वर्षांवरील लसीकरणाची परवानगी द्या, या सर्व गोष्टी केंद्र सरकार पुरवत आहे. तरीही केंद्राला दोष द्यायचा? शिवसेना दुजाभावाचे राजकारण करते आहे, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

सामनाचा अग्रलेख
कोरोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे व संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, असा सल्ला शिवसेनेने अप्रत्यक्षरीत्या विरोधकांना दिला आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘कोविडॉलॉजिस्ट’, त्यांचे हात मजबूत करणे प्रत्येकाचे कर्तव्य; शिवसेनेने केले अग्रलेखातून कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button