‘सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, पाच वर्षांत हजार कोटींचा घोटाळा’ – आशिष शेलार

Ashish Shelar& Uddhav Thackeray

मुंबई :- मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई (Mumbai Rains Flooded) झाल्याने भाजपने (BJP) शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) जोरदार टीका केली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षांत एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने महापालिका आणि शिवसेनेला घेरलं आहे.

शेलार यांनी ट्विट करून पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच बोट ठेवलं आहे. “मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय. घरात पाणी घुसू लागलंय. नालेसफाई कधी १०७ % तर कधी १०४ % झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”. पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकरहो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा.”

अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे. ‘डेब्रिजच्या गोण्या जशाच्या तशा नाल्यात, पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात… आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात!’ अशी टीका करतानाच आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा, असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button