… अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच – आशिष शेलार

Ashish Shelar-BMC

मुंबई :- मनपाच्या उत्पन्नात घट झाली असताना, करोना काळात अमाप खर्च झाल्याने मुंबई महापालिकेची (BMC) आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. अंतर्गत निधीतून कर्ज उचलणेही शक्य नसल्याने आता शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभारण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. यावरून शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली – … अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच!

‘हेरिटेज सफर’ (Heritage Journey) मध्ये पर्यटकांना पालिका मुख्यालयाची ऐतिहासिक इमारत आतून पाहण्याची संधी मिळणार आहे. शेलार यांनी याचा आणि मनपाने कर्जरोखे काढण्याचा संबंध जोडून ट्विट केले- “एकीकडे हेरिटेज वॉक सुरू करून ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत… दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला “बाजारात” उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच..नीट काळजी घेताय ना? कर्ज रोखेच विकताय ना? ७/१२ वर मालक मुंबईकरच राहणार ना?”

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पर्यटकांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना ही ‘हेरिटेज सफर’ करता येणार आहे. या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी मागील वर्षात पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या निर्णयावरून व कर्ज रोख्यांच्या मुद्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

ही बातमी पण वाचा : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रभुणे यांना महापालिकेची नोटीस ; आशिष शेलार संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER