भाजपचे आमदार आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला! उलटसुलट चर्चांना उधाण

ashish-shelar-meets-sharad-pawar

मुंबई :- मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) पोहचले आहेत. त्याआधी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे नेते आशिष शेलार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहचल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण भेटायला पोहचले होते. मराठा आरक्षण बैठकीनंतर दिल्लीत चव्हाण हे पवार यांच्या भेटीला पोहचले आहे. या बैठकीनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार हेसुद्धा शरद पवार यांच्या निवास्थानी पोहचले आहेत.

आशिष शेलार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, याआधीसुद्धा आशिष शेलार यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी राजकीय चर्चा रंगल्या होत्या.

ही बातमी पण वाचा : केरळमध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटण्याची शक्यता  ; शरद पवार ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी करणार दौरा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER