मनसेची बैठक; आशिष शेलारांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या

Raj Thackeray And Ashish Shelar

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सोमवारी मुंबईत आयोजित बैठकीच्या ठिकाणी भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावण्याच्या मागणीसाठी येत्या ९ तारखेला मनसेकडून मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याची रणनीती निश्चित करण्यासाठी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली.

राज ठाकरे अवघी १० मिनिटे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून बाहेर पडले. मात्र, या ठिकाणी आशिष शेलार यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मात्र, आशिष शेलार यांनी आपण वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.

‘सीएए’ समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक