आशिष शेलारांनी घेतली राज्यपालांची भेट, मारहाण करणाऱ्यांवर योग्य कारवाईची मागणी

Governor Bhagat Singh Koshyari - Ashish Shelar

मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना (Shiv Sena) शाखाप्रमुख कमलेश कदम (Kamlesh Kadam) याच्यासह 6 जणांचा समावेश आहे. मात्र पोलिसांनी योग्य कलमे न लावल्याने या सर्वाना तात्काळ जामीन मिळाला होता. त्यामुळे भाजप अधिकच आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.

ट्विटच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली. निवृत्त नेव्ही अधिकारी शर्मा यांना मारहाण करणाऱ्यांवर योग्य कलमे लावून कडक कारवाई करा, या मागणीसाठी पुण्याच्या वीर सेनानी संस्थेचे कर्नल व्ही.एम पत्की (निवृत्त) कर्नल एस.पी शुक्ला, मेजर ओम प्रकाश पाल, नवनाथ मुर्हे आणि मी आज मा.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER