गटनेता नसताना सत्तास्थापनेचा दावा म्हणजे ‘पागलपंती’ : आशिष शेलार

महाविकासआघाडीवर टीकास्त्र

Ashish Shelar

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे, पण गटनेता नसताना असा सत्तास्थापनेचा दावा करणे म्हणजे ‘पागलपंती’ असल्याचा घणाघात भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, महाविकासआघाडीचे पत्र म्हणजे आपापल्या पक्षातील आमदारांचे बंड शमवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. काँग्रेसने अजूनही त्यांचा गटनेता निवडला नाही. तसेच अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत.

जयंत पाटील यांची राष्ट्रवादीने गटनेतेपदी निवड केली असली तरी त्याला अजून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अजित पवार यांचाच व्हीप चालेल, असा विश्वासही शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.