आशिष शेलार यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना तपासणीचा सल्ला!

Ashish Shelar

मुंबई : गेल्या एक-दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा (Corona Virus) प्रकोप वाढत चालला आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची (Corona Positive) लागण झाल्याचे समोर आले आहे. आता भाजप (BJP) नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

भाजप नेते आशिष शेलार यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. “मी आज कोविड-१९ ची तपासणी केल्यास माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेत, त्या सर्वांनी स्वत:ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button