चर्चेला कुठेही बोलवा ; शेलारांचे आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

Ashish Shelar - Aditya Thackeray

मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे आव्हान भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिले आहे.

कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यावरून भाजपने आता शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे . बाफना नावाच्या व्यक्तीने न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. जानेवारी १९९७ मध्ये त्यावर स्थगिती आदेश दिला आहे, असा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यानंतर आपण महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एवढी मोठी जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय का घेतला? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

केंद्र सरकारने कांजूरमार्गची जागा आमची असल्यामुळे राज्य सरकारने मेट्रोचे काम थांबवण्याचे पत्र पाठवल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या ५० हजार कोटींच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण उद्धव ठाकरेजी आज काँग्रेससोबत करताय की काय? असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER