पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं, पण खबरदार जर… आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई :- कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर गृह विभागाने नव्याने आदेश बजावून शिवजयंती (Shiva Jayanti) साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. यावरून भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं. सरकारचे असे आमंत्रण आले बरं का, असा टोला शेलारांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.

भायखळ्याला पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं. सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का. पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर, असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे, असे ट्विट शेलारांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : बंद दाराआड झालेल्या चर्चेचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER