कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? आशिष शेलारांची सरकारवर टीका

Ashish-Shelar-Uddhav Thackeray

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) खड्ड्यावरून विरोधी पक्ष भाजप (BJP)आक्रमक झाला आहे. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. गतवर्षी खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी या वर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा ‘स्तुत्य उपक्रम’ का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का या वर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा प्रश्न उपस्थित करून आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली. वेळीच ई-पास उपलब्ध करून दिले नाहीत, एसटी उपलब्ध करून दिली नाही, रेल्वेगाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीच केली नाही. क्वॉरंटाईन कालावधी व आरोग्याच्या उपाययोजना याबाबत सरपंच व कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्याशी वेळीच चर्चा केली नाही. अशा सरकारच्या आडमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहचला त्या चाकरमान्यांचे मुंबई- गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीस आणला, असं शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER