अमिबालाही लाज वाटेल! परस्परविरोधी भूमिकांवरून आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

Ashish-Shelar

मुंबई : वेवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकेवरून शिवसेनेवर (Shivsena) बोचरी टीका करताना भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणालेत की, खाली डोके आणि वर पाय अशी शिवसेनेची स्थिती झाली असून यांच्यापुढे अमीबालाही लाज वाटेल. अमीबा हा सतत आकार बदलणारा जिवाणू आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेतली व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. यावर टीका करताना शेलार म्हणालेत की, “कोणी कोणाला कधी आणि कसे भेटावे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण, शिवसेना शेतकरी आंदोलकांना भेटायला गेली असेल तर लोकसभेत, राज्यसभेत, महाविकास आघाडीच्या बैठकीत तिची या आंदोलनाबत काय भूमिका होती आणि आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनावेळी काय भूमिका होती हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शिवसेना हा अमिबाला सुद्धा लाज वाटावी अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा पक्ष आहे.

परराज्यातून टीका हा महाराष्ट्रद्रोह, परदेशातून बदनामी केली तर आनंदाच्या उकळ्या !

शेतकरी आंदोलनाला परदेशातून पाठिंबा व्यक्त करताना मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे शिवसेनेने समर्थन केले. यासाठी शिवसेनेला टोमणा मारताना शेलार म्हणालेत, महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावे.

शरजीलवरुन टीका

शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. शरजीलने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिले? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे. हे त्यांचे पाप आहे, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER