हे सरकार नशा बहाद्दरांचे आहे की उत्सवप्रेमींचे, अशी शेलारांची घणाघाती टीका

Ashish Shelar & Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचे (Corona) कारण समोर करुन ऐनवेळी राज्यातील उत्सवांवर सरकारकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारलाखडे बोल सुनावले आहे. एकीकडे हे सरकार बार आणि पब्स सुरु ठेवण्याच्या वेळा वाढवत आहे, दुसऱ्या बाजूला उत्सवप्रेमींच्या आनंदात विरजण घालते, अशी टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला चांगलेच फैलावर घेतले. मागे गणेशोत्सवासाला केवळ 5 दिवस बाकी असताना 9 फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये गणेशमूर्तीची उंची 4 फुट आणि मंडपांच्या आकारावर ही निर्बंध घातले, असे शेलार यांनी म्हटले.

ठाकरे सरकारला (Thackeray Government) गणपती उत्सवाच्या तयारीला किती वेळ लागतो हे माहिती नाही का? गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का? नियम आधीच का जाहीर केले नाहीत? आता तयार झालेल्या मुर्त्यांचे काय करायचे? कोणीही मागणी न करता बार, पब्स रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मोकळीक देणार आणि हिंदुंच्या गणेशोत्सवात मात्र विघ्न घालणार. हे सरकार नशा बहाद्दरांचे आहे की उत्सवप्रेमींचे, असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विट करत उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER