एवढी का तणतण करत आहेत? आशिष शेलारांनी काढला संजय राऊतांना चिमटा

ashish_shelar_and_sanjay_raut

मुंबई : पत्नी वर्षा राऊत (Varsh Raut) यांना ईडीने नोटीस (ED Notice) बजावल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केला . यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे .

शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या! असे म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना नाव न घेता लक्ष्य केले आहे.

ही बातमी पण वाचा : घटना कोणाला शिकवता? ED चा वापर करून सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडलं पाहिजे -शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER