‘वाघाचे’ नाव घेऊन ‘सशाच्या’ काळजाचे सरकार का आणताय? – आशिष शेलार

ashish-shelar-criticize-shivsena CM Uddhav Thackeray

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी सरकारची आज बहुमत चाचणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महाविकास आघाडीला बहुमत आहे, तर मग भिती कशाची ? आपल्या आमदारांवर मुठभरही विश्वास नाही, मग महाआघाडी कशाची? सत्यमेव जयते म्हणताय मग असत्यमेवची वाट का धरताय? ‘वाघाचे’ नाव घेऊन ‘सशाच्या’ काळजाचे सरकार का आणताय?, असा सवाल शेलांनी टीका केली आहे.

आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही- जयंत पाटील

महाविकास आघाडीच्या शपथविधीवर भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.