मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय? आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chauhan) आत्महत्याप्रकरणी पहिल्यांदाच संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मीडियासमोर आपली बाजू मांडली . त्यानंतर आता भाजपचे (BJP) नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडले .

मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतोच कसा?, त्याला परवानगी मिळते का आणि ती कशी मिळते. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली, त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती की नाही?. ज्या भगिनीच्या नावानं संशय उभं राहिलंय ती भगिनीही त्याच समाजाची आहे. त्यामुळे मोठं कारस्थान या प्रकारच्या गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्याठी होतंय. आतापर्यंत पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव होता, आता पोलीस यंत्रणेवर आम्ही सामाजिक दबाव टाकू, असेही त्यांनी दाखवून दिले , असे टीकास्त्रही आशिष शेलार यांनी सोडले .

हिंमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा प्रकारचा संदेश दिला जातोय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून या प्रकरणात नेमक्या काय गोष्टी गुलदस्त्यात आहेत, त्या समोर आणणं आवश्यक आहे. पोलिसांवर खूप मोठा दबा२४व आहे, देवेंद्र फडणवीसांनीही ते स्पष्ट केले . ज्या भोवती संशयाचं भवरं फिरतंय तो राज्याचा मंत्री आहे, असेही शेलार म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER