सत्तेची फळे खाल्यानंतर, त्याच झाडाची मुळं खणणाऱ्या लबाड लांडग्यांची हीच गत होणार – आशिष शेलार

ashish_shelar_and_sanjay_raut

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात ठेवण्यात राज्यकर्ते सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र प्रदेश भाजपाने राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरु केले आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यास महाराष्ट्रातील ठाकरे सरकार असमर्थ ठारत असल्याचे विरोधी भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे.

डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा:- … पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे- बोलावे – शिवसेना

आणि यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे?, सत्तेची फळं खायची,त्याच झाडाची मुळं खणायची! त्यांची अशीच गत व्हायची! आता बोलून नाही, महाराष्ट्रात करुन दाखवा! #samana , असे म्हणत त्यांनी राऊतांना लक्ष केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला