“गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ! कृषि विधेयकावरील शिवसेनेवर भाजपाचे टीकास्त्र

Ashish Shelar-CM Uddhav Thackeray

मुंबई : केंद्र सरकार कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहे.मात्र, या विधेयकासंदर्भात शिवसेनेने संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेनेनं सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!”, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून टीका केली आहे.

दरम्यान मोदी सरकारने (Modi Government) कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली. लोकसभेत तिन्ही विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर दोन विधेयके रविवारी राज्यसभेत मांडण्यात आली. यावेळी लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग केला. त्यामुळे शिवसेनेच्या (Shiv Sena) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER