आशिष शेलार नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रभारी नियुक्त

Ashish Shelar

मुंबई : भाजपाने (BJP) नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी (Navi Mumbai Municipal Corporation Elections) प्रभारी म्हणून नेमले आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे.

आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईत पक्षाला मिळवून दिलेल्या यशानंतर गुजरात, कर्नाटक सह नुकतेच हैदराबाद महापालिका निवडणुकीत सहप्रभारी म्हणून आमदार अँड. आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.

मुंबईत मंगळवारी (५ जानेवारी) रोजी भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडण्यापासून ते निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. बहुतांश महापालिकेत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. काही ठिकाणी शक्य असेल तर स्थानिक आघाडी करुन भाजपा निवडणूक लढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER